नुकतेच मी डॉ. विनायक नागेश श्रीखंडे याचे आत्मचरित्र ’...आणि दोन हात’ वाचले. इंग्लंडमधल्या दोन्ही एफ. आर. सी. एस. परिक्षा पहिल्याच प्रयत्नात पार करणारे, एक उत्कृष्ट नावाजलेले सर्जन, स्वतःच्या तोतरेपणावर मात करून उत्तम वक्ता व उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. श्रीखंडे यांचे आत्मचरित्र त्यांच्या जीवनाप्रमाणेच अद्भूत आहे. जो जीवनात सदैव विद्यार्थी असतो तोच उत्कृष्ट शिक्षक बनू शकतो हा विचार हे पुस्तक वाचताना प्रत्ययास येतो. डॉ. श्रीखंडे यांनी जशा आपल्या चूका मोकळेपणाने मान्य केल्या आहेत तसेच नर्स, वॉर्डबॉय ते मरणाशी झुंज देणार्या रुग्णाकडूनही ते अनेक गोष्टी शिकले त्याच्याही उल्लेख त्यांनी आपल्या ह्या पुस्तकात केला आहे.
आईवडिलांकडून झालेले संस्कार, त्यांच्या कडून मिळालेले प्रामाणिकपणा, सचोटी, शिस्त व कार्यक्षमता हे गुण घेऊन व ते स्वतःमध्ये उतरवूनच ते जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले आहेत. अतिशय सुंदर असे पुस्तक हे प्रत्येकाने वाचायलाच हवे.
No comments:
Post a Comment