Monday, January 27, 2014

चरखा योजना - Charakha Yojana

चरख्याच आणि भारताच नातं तस जुनच. स्वदेशी आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणार्‍या या चरख्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली. आज खेड्यातल्या नव्हेच तर अनेक लहान शहरातल्या मुलांकडेही  आपले शरीर झाकण्याएवढेही वस्त्र नसते. त्यामुळे ती मुले शाळेत जात नाहीत व शिक्षणापासुन वंचित रहातात. या निरक्षरतेमुळे गरिबी वाढते. परम पूज्य बापूंनी ही चरखा योजना हे गरिबी व निरक्षरतेचे चक्र तोडण्यासाठी काढली होती.



जशी जशी रामनवमी जवळ येते तेव्हा प्रत्येक श्रद्धावान volunteer स्वतःच्या ३६ लड्या पूर्ण करण्याचे target प्राप्त करण्याचा प्रयास करत असतो. पण आपल्याला माहित आहे का की आपण जमा केलेल्या लड्यांचे पूढे काय होते ते? तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चला माझ्याबरोबर या लड्यांपासून युनिफॉर्म बनण्याच्या रोमांचक सफरीवर.


आपण जो चरखा वापरतो तो अहमदाबाद येथून आणला जातो. येणारा प्रत्येक चरखा हा volunteers कडून check केला जातो जेणेकरून श्रद्धावानांना तो चालवताना त्रास होणार नाही.


आपण लड्या काढण्यासाठी दोन स्पिंडलच्या चरख्याचा उपयोग करतो. सहा किंवा आठ स्पिंडलचाही चरखा आपल्या संस्थेत उपलब्ध आहे. दोन बाँबिन पूर्ण भरण्यासाठी साधारणतः एक ते सव्वा तास लागतो. या दोन बाँबिन मधुन एक लडी आरामात निघते. या सगळ्या लड्या श्री हरिगुरुग्राम किंवा उपासना केंद्रात जमा केल्या जातात. लड्यातून बनणार्‍या कापडापासून युनिफाँर्म शिवले जातात व त्याचे वाटप कोल्हापूर मेडिकल कँप येथे होते.
दोन स्पिंडलचा चरखा



सहा स्पिंडलचा चरखा

श्री हरिगुरुग्राम मध्ये ह्या लड्या एकत्र करून त्यांचा किलोप्रमाणे गठ्ठा बनवला जातो. साधारणतः एक किलोत चाळीस लड्या येतात. या एक किलो लड्यांमधुन शर्टसाठी अंदाजे सहा मीटर किंवा पँटसाठी अंदाजे साडे पाच मीटर कापड निघते. यात पॅटसाठी दोन सुती कापड आणि शर्टसाठी दीड सुती कापड असे दोन प्रकार येतात.


लड्या श्री हरिगुरुग्राम मध्ये जमा केल्यावर ते तोलणूर (सोलापूर), बुधगाव (सांगली), सिहोर (गुजरात) इथे विणकामासाठी पाठवले जाते. यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विणकाम हे हातमागावरच करतो जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा.



















विणलेले कापड डोंबिवली येथे डाईंग व ब्लिचिंगसाठी पाठवले जाते. आपण ज्या ज्या शाळेत युनिफाँर्म  वाटप करणार आहोत त्या शाळेच्या कलर कोड प्रमाणे कापड रंगद्रव्यात ’डाय’ केले जाते. आपण शाळेत खाली दिलेल्या रंगाचे युनिफाँर्म वाटतो.


1) White Shirt and Khaki Pants - For Boys
    White Shirt and Blue Pinaco - For Girls
2) Sky blue Shirts and Dark Blue Pants - For Boys
    Sky blue Shirts and Dark Blue Pinaco - For Girls
3) Pink Shirts and Maroon Pants - For Boys
    Pink Shirts and Maroon Pinaco - For Girls


नंतर हे प्रोसेस झालेले कापड परेल येथील गारमेंट्स फँक्टरी मध्ये योग्य त्या मापात कापून शिवण्यासाठी पाठवले जाते.









युनिफाँर्म शिवल्यानंतर ते मरोल/जोगेश्वरी येथे स्थानीक भक्तांकडे एक्स्ट्रा थ्रेड कटिंग आणि पाँलीथीन बँग मध्ये पँकिंगसाठी पाठवले जाते.


कोल्हापुर मेडिकल कँप साठी प्रत्येक शाळेतून इयत्तेप्रमाणे विद्याथ्यांची लिस्ट येते. ही लिस्ट आल्यानंतर युनिफाँर्म शाळेप्रमाणे बाँक्समध्ये पँक केले जातात.







युनिफाँर्म बाँक्समध्ये पँक केल्यानंतर त्या बाँक्सवर त्या शाळेचे नाव असलेले लेबल आणि बाँक्समधील इयत्तेप्रमाणे युनिफाँर्मच्या संख्येचे लेबल चिकटवले जाते.








आपण लड्या संस्थेत जमा केल्यानंतर त्याचे युनिफाँर्म बनण्याच्या प्रक्रियेला अंदाजे सहा महिने लागतात. आपला कोल्हापूर मेडिकल कँप साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो. युनिफाँर्म तयार होऊन आल्यानंतर त्यांचे पँकिंग करण्यासाठी कमीत कमी एक महिना लागतो. म्हणजेच जून ते जूलै महिन्यापर्यतच ज्या लड्या जमा होतात त्याच लड्या येण्यार्‍या कोल्हापूर मेडिकल कँपमधील  युनिफाँर्म शिवण्यासाठी वापरल्या जातात.

 





यंदाच्या कोल्हापूर कँप २०१२ मध्ये आपण अंदाजे ८८०० विद्यार्थ्यांना युनिफाँर्म वाटप केले गेले. हे युनिफाँर्म शिवण्यासाठी अंदाजे ४०,००० मीटर कापड वापरले गेले.


आपण कोल्हापुर मेडिकल कँप मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन युनिफाँर्मचा एक सेट देतो. या दोन युनिफाँर्म साठी लड्या संस्थेकडे जमा केल्यापासून युनिफाँर्म शिवून त्याचे पँकिंग होईपर्यत संस्थेला अंदाजे ३३८ रुपये खर्च येतो. यात आपण वाहतुकीचा खर्च, octroi, toll tax गृहीत धरलेला नाही. याचाच अर्थ जर आपण यंदाच्या कोल्हापुर मेडिकल कँप मध्ये अंदाजे ८८०० विद्यार्थ्याना युनिफाँर्म वाटप केले असेल तर त्यासाठी आपल्या संस्थेला किती खर्च आला असेल याची कल्पना करा.**


जर कोणाचा चरखा बिघडला असेल तर तो त्याच्या घरी जावून दुरूस्त करणे, आपली युनिफाँर्म बनवण्याची जी काम चालू असतात त्याचा follow up ठेवणे व तेथे वेळोवेळी visits करणे, अहमदाबाद येथून प्रत्येक चरखा पूर्ण check करून तो मुंबईला आणणे अशी अनेक कामे आपले चरखा volunteers स्वतःच्या कामाच्या वेळा सांभाळून करत असतात.


आपण सूत काढताना जर चरखा चालवण्याचा speed कमी जास्त झाला तर त्याचा परिणाम हा सूताच्या quality वर होतो. जर speed कमी जास्त झाल्यामूळे कच्चे सूत आले तर ते फूकट जाते, कारण कापड विणतेवेळी हे कच्चे सूत तुटते. ह्या साठीच चरखा कसा चालवावा, चरख्यात कुठले पार्टस्‌ वापरले जातात, चरख्याची दुरूस्ती कशी करावी यासाठी चरखा माहिती पुस्तीका आपल्या संस्थेने काढली आहे. प्रत्येक श्रद्धावानाने ती जरूर वाचावी. जेणेकरून आपण व्यवस्थीत प्रकारे चरखा चालवू शकू व तो चांगल्या प्रकारे maintain ठेवू शकू.


मित्रांनो, चला मग आपण जोमाने कामाला लागूया चरखा चालवण्यासाठी........................

**वरिल नमूद केलेल्या आकडेवारीत काही अंशी तफावत असणे शक्य आहे.