Saturday, July 10, 2010

गुरुपौर्णिमा २०१०

गुरुपौर्णिमेचा उत्सव दिनांक २५ जुलै २०१० रोजी सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे तेरापंथ भवन, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित केला आहे. हा उत्सव सकाळी १०:०० पासून रात्री ९:०० पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. सर्व भक्तांनी सोहळ्याला उपस्थित राहवे आणि आपल्या लाडक्या बापूंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

गुरुपौर्णिमा उत्सवाची थोडक्यात रुपरेखा -

१) प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध बापू , प. पू. नंदाई व प. पू. श्रीसुचितदादांचे आगमन.

२) सदगुरुंचे औक्षण व पुष्पवृष्टी.

३) स्टेजवर दत्तगुरुंची मूर्ती स्थापन करण्यात येईल.

४) सदगुरुंचे स्टेजवर आगमन त्यानंतर अनिरुद्ध चलिसा पठण.

५) सुशोभित केलेल्या कावङींमधून उदी सदगुरुंचा हस्तस्पर्श करुन घेणे व त्यानंतर उदीचा प्रसाद प्रत्येकासाठी उपलब्ध असेल.

६) स्टेजवरील दत्तगुरुंच्या मूर्तीवर ठराविक कार्यकर्त्यांकडून तुलसीपत्र अर्पण केले जाईल व संपूर्ण दिवस 'ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः' या मंत्राचे पठण.

७) अनिरुद्ध चलिसा झाल्यावर साईराम जपाची सी. डी. लावण्यात येईल व रामनामाच्या लगद्याने बनविलेल्या इष्टीका घेऊन प्रदक्षिणेला सुरुवात होईल.

८) सदगुरुंच्या दर्शनासाठी भक्तांची लाईन सोडण्यात येईल.

९) दर १ तासाने अनिरुद्ध चलिसाचे पठण व उदी हस्तस्पर्शित करुन घेतली जाईल.

१०) संपूर्ण दिवस अनिरुद्ध अग्निहोत्रात उद अर्पण करता येईल.

११) महाआरती.

तेरापंथ येथे येण्यासाठी खाली दिलेल्या नकाशावरील मार्गाचा वापर करावा.


2 comments:

  1. Very Nice Update given By you....Keep it up...hari om

    ReplyDelete
  2. Nice it is very important information u have added for the bapubhakt Hari om

    ReplyDelete